पडद्यावरचा विलीयन लॉकडाऊन मध्ये हिरोच्या रुपात :
आउटलुक वृत्त्वहीनेने घेतलेल्या एका मुलाखतीनुसार सोनू सूद हे एकदा रस्त्यावरून चालले असताना त्यांनी काही मजूरांना चालत आपल्या गावी जाताना पाहिले आणि आपण ह्यांच्यासाठी काहीतरी करावं असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी त्या लोकांना तुमच्या घरी तुम्हाला सुखरूपपणे पोहोचवण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर सोनू सूद ह्यांनी त्यांच्या संबंधितांच्या मदतीने सरकारी कर्मचार्यांशी संपर्क साधून पुढील दोन दिवसात त्यांना पोहोचवण्याची सर्व व्यवस्था केली आणि ३५० स्थलांतरित मजुरांना परत कर्नाटकात आपल्या घरी पाठवले. पण त्यांना घरी पाठवत असताना सोनू सूद ह्यांना त्या मजुरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यांत अश्रू आलेले दिसले आणि ते पाहून हे फक्त ३५०च आहेत आणि आपण नक्कीच अश्या शक्य तितक्या जणांना परत घरी पाठवलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला. आणि इथूनच "घर भेजो" मोहिमेचा प्रारंभ झाला.
ह्यानंतर सोनू सूद ह्यांनी आपली स्वतःची एक टीम बनवून "घर भेजो" ही मोहीम सुरू केली आणि त्यांनी 18001213711 हा एक टोल फ्री नंबर जाहीर केला. जेणे करून कोणी मजूर आपल्या गावी परत जाण्यास इच्छुक असेल तर ते ह्या टोल फ्री लाईनवर संपर्क करू शकतात आणि ह्यामुळे ''घर भेजो" ची टीम सुखरूपपणे त्या मजुरांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करून देते.
२५ मे ला आऊटलुकने घेतलेल्या मुलाखतीनुसार सोनू सूद आणि त्यांच्या टीमने "घर भेजो" ह्या मोहिमेमार्फत आत्तापर्यंत १२,००० स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी पोहोचवले आहे आणि आधीच त्यांनी आणखी ४५,००० मजुरांची सुद्धा व्यवस्था करून ठेवलेली आहे. अजून यापूढे सुद्धा शक्य तितक्या जास्त मजुरांना आम्ही त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याचा प्रयत्न करू असे सोनू सूद ह्यांनी सांगितले आहे.
हे झालं लॉकडाऊन मधील कार्य. पण सोनू सूद हे खूप वर्षांपासून आपल्या वडिलांच्या नावाने ''शक्ती अन्नदानम्" म्हणून एक अन्नछत्र चालवत आहेत. सोनू सूद च्या चालू असलेल्या कार्यास मिमर्सनी सुद्धा आपल्या स्टाईलने सलामी दिली आहे. तर पाहुयात काय काय मिम्स बनले आहेत सोनू सूद आणि "घर भेजो"च्या टीमवर.








No comments:
Post a Comment