३८ आणि ४२ वर्षांची दोन लहान मुलं :
आपण बऱ्याच वेळा मिमवर दोन कृष्णवर्णीय (dark colored) लहान मुलांना पाहतो. जर मी आता तुम्हाला सांगितलं की हे दोघे लहान मुलं नसून मोठी माणसं आहेत तर? नक्कीच तुम्हाला हसू आवरणार नाही ना? पण हे दोघे खरंच लहान मुलं नसून ३८ आणि ४२ वर्षांची मोठी माणसं आहेत. तर बघून घेऊ नक्की मीममध्ये दिसणारी ही दोन पात्र नक्की आहेत कोण.
ही दोन्ही पात्र नायजेरियन फिल्म स्टार असून नायजेरियाच्या ''aki na ukwa" नावाच्या सुप्रसिद्ध विनोदी चित्रपटातील आहेत. यामधील एकाचं नाव osita Iheme असून त्याने ह्या चित्रपटात "PawPaw" नावाची भूमिका साकारली आहे आणि दुसऱ्या कलाकाराचं नाव Chinedu Ikedieze असून त्याने ह्या चित्रपटात "aki" नावाच्या पात्राची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २००३ मध्ये नायजेरियामध्ये प्रदर्शित झाला. Osita Iheme यांचे सध्याचे वय ३८ वर्ष असून Chinedu Ikedieze यांचे सध्याचे वय हे ४२ वर्ष इतके आहे.
Osita Iheme यांनी यांच्या करिअर मध्ये आतापर्यंत ५० चित्रपटांमध्ये काम केलं असून Chinedu Ikedieze ह्यांनी ह्यांच्या २० वर्षांच्या कार्यकिर्दीत आतापर्यंत एकूण १५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच "aki na ukwa" व्यतिरिक्त "2 rats", "Boys from Holland", "Tom and Jerry", "Stubborn Files", ह्यांसारख्या अनेक चित्रपटात ह्या दोघांनी एकत्रित काम केले आहे.







No comments:
Post a Comment