फोन वर बोलणारा ख्रिस हेमस्वर्थ उर्फ थॉर :
सध्या एक्सट्रेकशन (EXTRACTION) चित्रपटातील ख्रिस हेमस्वर्थ म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका विजेचा देव थॉर याचा फोनवर काहीतरी संवाद चालू असल्याचा एक मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर जाणून घेऊया नेमका काय आहे ह्या मीम ची स्टोरी.
मी ह्या मिमची नक्की काय स्टोरी आहे ते सांगणार नाही कारण कदाचित ते ऐकून चित्रपटातील एका सीन चा स्पोईलर दिल्याचा माझ्यावर आळ येऊ शकतो. पण मी ह्या चित्रपटाबद्दल काही गमतीदार माहिती तर नक्कीच देऊ शकतो.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रामुख्याने तरुणांना ही मीम मधली व्यक्ती कोण आहे आणि हा मीम नक्की कशावर आधारित आहे हे माहीत आहे. आपण सर्वजण ह्या व्यक्तीला थॉर ह्या सुप्रसिद्ध नावाने ओळखतो. याचे मुख्य कारण म्हणजे मर्व्हल सिरीजच्या अवेन्जर्स मध्ये थॉर नावाच्या एका सुपरहिरोची भूमिका ह्याने अतिशय उत्तम प्रकारे साकारली आहे. आणि हा मीम ज्या चित्रपटावर आधारित आहे त्या चित्रपटाचं नाव आहे एक्सट्रेकशन (EXTRACTION).
तर जाणून घेऊया एक्सट्रेकशन (EXTRACTION) चे काही इंटरेस्टिंग फॅक्टस् :
#फॅक्ट १ :
ह्या चित्रपटाचे निर्माते (producer) स्वतः ख्रिस हेमस्वर्थ हे असून यांनी ह्या चित्रपटात प्रमुख अभिनेता (lead actor) ची भूमिका साकारली आहे. चित्रपटात एका मोठ्या गँगस्टरच्या अपहरण (kidnap) झालेल्या मुलाला वाचवण्यासाठी ख्रिस हेमस्वर्थ ह्यांची निवड करण्यात आलेली असते.
#फॅक्ट २ :
ह्या चित्रपटाचे नाव तीन वेळा बदलण्यात आले. पहिल्यांदा जो रुस ह्यांनी जेव्हा ह्या चित्रपटाचा स्क्रीनप्ले लिहला तेव्हा ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक (Director) सॅम हॅरग्रेव्ह ह्यांनी ह्या चित्रपटाचं नाव ढाका असं घोषित केलं. त्यानंतर ह्या चित्रपटाचे नाव 'आऊट ऑन फायर' म्हणून बदलण्यात आले. अखेरीस १९ फेब्रुवारी २०२० मध्ये ह्या चित्रपटाचे नाव एक्सट्रेकशन (EXTRACTION) म्हणून निश्चित केले.
#फॅक्ट ३ :
ह्या चित्रपटाचं शूटिंग हे सुरवातीला अहमदाबाद आणि मुंबई येथे करण्यात आलं. आणि त्यानंतर काही प्रमाणात थायलंड आणि बांग्लादेश येथे काही प्लेटशॉट्स घेण्यात आले.
#फॅक्ट ४ :
बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुडा आणि पंकज त्रिपाठी हे दोघेही ह्या चित्रपटात दिसून येत आहेत आणि ह्या दोन्ही कलाकारांचं हॉलिवूड चित्रपट सृष्टीतील हे प्रथम पदार्पण आहे.
#फॅक्ट ५ :
हा चित्रपट नेटफलिक्स द्वारे रिलीज झाला असून मे २०२० मध्ये जो रुस ह्यांना ह्या चित्रपटाची उत्तरकथा (sequel) लिहिण्यासाठी नियुक्त करण्यात आले असल्याचे वृत्त आलेले आहे. आणि तो देखील नेटफलिक्सवरच रिलीज होईल. त्यामुळे लवकरच आपल्याला ह्या चित्रपटाची उत्तरकथा (sequel) नेटफलिक्सवर पाहायला मिळेल.
तर हा होती फोनवर बोलणाऱ्या ख्रिस हेमस्वर्थ उर्फ थॉर च्या मीम ची स्टोरी आणि एक्सट्रेकशन (EXTRACTION) चित्रपटातील काही गमतीदार फॅक्टस्.
आता नजर टाकूया ह्याच्यावरील मिम्स वर :
तर हा होता आजचा विषय 'फोन वर बोलणारा ख्रिस हेमस्वर्थ उर्फ थॉर'.
पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. ब्लॉग कसा वाटला ह्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. तसेच ब्लॉग ला follow करा जेणे करून प्रत्येक नवीन ब्लॉग आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला notification येईल. आणि हो ब्लॉग आवडल्यास शेअर करण्यास विसरू नका.
पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. ब्लॉग कसा वाटला ह्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. तसेच ब्लॉग ला follow करा जेणे करून प्रत्येक नवीन ब्लॉग आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला notification येईल. आणि हो ब्लॉग आवडल्यास शेअर करण्यास विसरू नका.






No comments:
Post a Comment