आत्मनिर्भर
१२ मे २०२० रोजी मंगळवारी नेहमीसारखं आपले मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपले काही जड शब्द वापरून भाषण दिलं. त्यात त्यांनी आत्मनिर्भर ह्या शब्दाचा प्रामुख्याने वापर केला. आणि मग काय. आपली मिमर्सची फौज झाली सुरु. तर जाणून घेऊया नक्की भानगड काय आहे.१२ मे ला मोदींनी जे भाषण केलं त्यात २१व्या शतकात जर आपल्या देशाची प्रगती व्हावी तर देश आत्मनिर्भर बनायला हवा असे सांगितले. आत्मनिर्भर बनणे म्हणजे नक्की काय तर स्वावलंबी बनणे. जर आपल्या देश सर्व क्षेत्रांमध्ये स्वावलंबी झाला तर नक्कीच आपल्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि भारत २१व्या शतकात नक्कीच प्रगती करू शकतो. आणि ह्याचसाठी मा. पंतप्रधानांनी "आत्मनिर्भर भारत अभियान" ह्याची अंमलबजावणी केली.
नक्की काय आहे "आत्मनिर्भर भारत अभियान"?
मा. पंतप्रधानांनी १२ मे ला २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली आणि त्यानुसार १३ मे ते १७ मे ह्या दरम्यान ५ पत्रकार परिषद घेऊन ह्या २० लाख कोटींचा हिशोब मांडला.२० लाख कोटी रुपयांतील विविध क्षेत्रांमध्ये झालेली विभागणी खालीलप्रमाणे :
१. ५.९४ लाख कोटी रुपये : लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था (non banking
financial institution) आणि वीज वितरक कंपन्यांना (power supply companies) मदत.२. ३.१० लाख कोटी रुपये : लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना २ महिन्यांपर्यंतच मोफत अन्नपुरवठा आणि शेतकऱ्यांना कर्ज.
३. १.५ लाख कोटी रुपये : कृषी आणि कृषिक्षेत्रासंबंधित उद्योगांना (agriculture and agricultiural business) मदत.
४. ४८ हजार १०० कोटी रुपये : कोळसा, विमान, अंतराळ विज्ञान (space science), शिक्षण, रोजगार, उद्योगधंदे आणि सरकारी क्षेत्रात मदत.
५. १ लाख ८२ हजार कोटी रुपये : पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज.
६. ८ लाख १ हजार ६०३ कोटी रुपये : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
तर हे आहे २० लाख कोटी रुपयांचं "आत्मनिर्भर भारत अभियान". आई गं...किती तो जड शब्द. पण एक भारतीय म्हणून आपल्याला हा शब्द उच्चरता येत नाही हि लाजिरवाणी गोष्टच नाही का?
आता एक छोटीशी झलक टाकुयात ह्यावरील मिम्स वर :
तर हा होता आजचा विषय 'आत्मनिर्भर'.
पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. ब्लॉग कसा वाटला ह्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. तसेच ब्लॉग ला follow करा जेणे करून प्रत्येक नवीन ब्लॉग आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला notification येईल. आणि हो ब्लॉग आवडल्यास शेअर करण्यास विसरू नका.
पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. ब्लॉग कसा वाटला ह्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. तसेच ब्लॉग ला follow करा जेणे करून प्रत्येक नवीन ब्लॉग आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला notification येईल. आणि हो ब्लॉग आवडल्यास शेअर करण्यास विसरू नका.





No comments:
Post a Comment