एका आठवड्यात भारतीयांनी ४.५ वरून १.३ वर आणलेलं अँप :
आज सर्वत्र प्रामुख्याने एकच फोटो दिसून येतोय. तो म्हणजे १.३ गूगल प्ले रेटिंग असलेला टिकटॉक अँप. ह्या अँप ची रेटिंग आठवड्यापूर्वी ४.५ होती. पण गेल्या आठवड्याभरात असं नेमकं काय घडलं जे ह्याची रेटिंग भारतीयांनी ४.५ वरून डायरेक्ट १.३ वर आणली. चला तर मग बघूया ह्या क्रांतीचा इतिहास.
युट्युब असो किंवा फेसबुक किंवा इन्स्टाग्राम, ट्विटर आता सगळीकडे मिमर्सनी आपलं साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे. आणि गेल्या एक दीड वर्षात ह्या सर्वच माध्यमातून टिकटॉक च्या हास्यास्पद कन्टेन्टवर वारंवार मिमर्सची फौज जोरदार हल्ले करत आहे. अश्याच वारंवार होणाऱ्या ह्या हल्ल्यांवर प्रतिहल्ला म्हणून आणि आपलं टिकटॉकर्सचं साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी टिकटॉक साम्राज्याचे सेनापती 'दि टिकटॉक स्टार अँड सोशल इन्फ्लुअन्सर' आमिर सिद्दीकी ह्यांनी शत्रूंवर टीका करणारा एक व्हिडीओ बनवला. ह्या व्हिडीओ मध्ये त्यांनी हे युट्युबर्स आपलाच कन्टेन्ट वापरून आपल्याला रोस्ट करतात असे म्हटले. शिवाय हे युट्युबर्स सहानुभूती गोळा करण्यासाठी व्हिडीओ बनवतात असाही आरोप आमिर सिद्दीकी यांनी त्यांच्या व्हिडिओ मार्फत केला. अखेरीस जिथे युट्युबर्स महिन्यातून एखाद - दोन कन्टेन्ट बनवतात तिथे टिकटॉकर्स दिवसाचे १० कन्टेन्ट बनवतात असा टोला त्यांनी युट्युबर्सवर मारून त्यांच्यावर कठोर टीका केली. आमिर सिद्दीकी ह्यांच्या ह्या प्रखर अश्या प्रतिहल्ल्यामुळे फार खळबळजनक वातावरण तयार झाले होते. आता ह्या हल्ल्याचा सूड कोण घेणार ही एकच चर्चा सर्वत्र चालू होती. अश्या वेळी युट्युब राजवटीचे सुभेदार अजय नागर उर्फ कॅरी मिनाती हे पुढे सरसावले आणि युट्युबर्सवर झालेल्या ह्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी विडा उचलला. आणि इथूनच युट्युब विरुद्ध टिकटॉक महायुद्ध सुरू झाले.
कॅरी मिनाती ह्यांनी आमिर सिद्दीकीने बनवलेल्या व्हिडीओचा बारकाईने अभ्यास केला. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये वापरलेल्या एक एक शब्दांवर प्रत्युत्तर देत शाब्दिक बाणांचा वर्षाव सुरू केला.
कॅरी मिनाती ह्यांनी आमिर सिद्दीकी यांच्या वक्तव्यावर केलेल्या काही टीका :
१. आमिर सिद्दीकी यांचे वक्तव्य : युट्युबर्स सहानुभूती गोळा करण्यासाठी व्हिडीओ बनवतात.
ह्यावर प्रत्युत्तर म्हणून कॅरी मिनाती ह्यांनी आमिरच्याच वॉलवरील त्याचा एक गरिबांना अन्न वाटप करत असताना एक व्हिडीओ दाखवून नक्की कोण सहनुभूती गोळा करत आहे असे दाखवून दिले.
२. आमिर सिद्दीकी यांचे वक्तव्य : जिथे युट्युबर्स महिन्यातून एखाद - दोन कन्टेन्ट बनवतात तिथे टिकटॉकर्स दिवसाचे १० कन्टेन्ट बनवतात.
ह्यावर प्रत्युत्तर म्हणून कॅरी मिनाती ह्यांनी '' जेवढ्या मिनिटांचे तुमचे व्हिडिओ असतात तेवढ्या मिनिटांची तर आमची एक युट्युबवरची ऍड असते" असा टोमणा मारला. यापुढे टिकटॉक वर व्हिडिओ बनवण्यासाठी १ मिनिटांची मर्यादा असूनही बरेचसे टिकटॉकर्स फक्त ३० सेकंदांचाच व्हिडिओ का बनवतात? असा सवाल त्यांनी टिकटॉकर्सना केला.
कॅरी मिनातीच्या ह्या हल्ल्यावर सर्व मिमर्सनी भरभरून प्रतिसाद दिला आणि कॅरी मिनातीचं कौतुक देखील केलं. मात्र काही कारणास्तव कॅरी मिनाती ह्यांचा हा ७० मिलियन व्ह्यूज असलेला टिकटॉकवर टीका करणारा व्हिडिओ युट्युब वरून काढून टाकण्यात आला. आणि त्यामुळे आधीच टिकटॉकचा तिरस्कार करणाऱ्या मिमर्सचा तसेच कॅरी मिनाती समर्थकांचा संताप आणखीच अनावर झाला आणि त्यांनी शेवटचा उपाय म्हणून सरळ टिकटॉक अँपलाच रिपोर्ट करून त्याची रेटिंग कमी करायला सुरुवात केली. आणि ह्यामुळेच ४.५ गूगल प्ले रेटिंगवर असणारं टिकटॉक अँप हे आठवड्याभरातच डायरेक्ट १.३ रेटिंगवर येऊन पोहोचलं.
ही माहिती बऱ्यापैकी सोशल मीडिया युसर्सना माहीत आहे पण कॅरी मिनातीचा व्हिडिओ युट्यूब वरून काढून टाकण्याचं नक्की कारण काय ते पाहुयात :
कारण १ :
युट्युबने डिसेंबर २०१९ ला 'हॅरॅसमेंट पॉलिसी' अस्तित्त्वात आणली होती. ह्या पॉलिसी अंतर्गत जर कोणीही युट्युबर किंवा कोणताही व्हिडिओ हा एखाद्या विशिष्ट गोष्टीला अथवा व्यक्तीला लक्ष्यवेधीत करत असेल तर युट्युब युजर त्या व्हिडिओला हॅरॅसमेंट पॉलिसी अंतर्गत रिपोर्ट करू शकतो. कॅरी मिनातीचा व्हिडिओ हा पूर्णतः आमिर सिद्दीकीला आणि टिकटॉकवर टीका करणारा होता त्यामुळे आपसूकच सर्व टिकटॉक समर्थकांनी त्या व्हिडिओला हॅरॅसमेंट पॉलिसी अंतर्गत रिपोर्ट केले आणि त्यामुळे हा व्हिडिओ युट्युबवरून गूगल व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्विस मार्फत काढून टाकण्यात आला.
कारण २ :
तसेच जर कोणाच्या लैंगिक आवडीनिवडीबद्दल कोणी आपल्या युट्युब व्हिडिओ मार्फत द्वेषयुक्त अपमान करत असेल तर युजर त्या व्हिडिओला त्वरित रिपोर्ट करू शकतो. कॅरी मिनातीच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट स्पष्ट दिसून येत होती त्यामुळे टिकटॉक समर्थकांनी ह्या पॉलिसी अंतर्गत त्या व्हिडिओला रिपोर्ट केलं आणि तो व्हिडिओ युट्युब वरून काढून टाकण्यात आला.
वर नमूद केलेल्या दोन्ही पॉलिसीजचा फायदा घेत टिकटॉक समर्थकांनी कॅरी मिनातीच्या व्हिडिओला रिपोर्ट केले आणि ह्याच कारणांमुळे कॅरी मिनातीचा व्हिडिओ गूगल व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्विस मार्फत युट्युबवरून काढून टाकण्यात आला.
कॅरी मिनातीच्या व्हिडिओ काढून टाकल्यामुळे संतप्त झालेल्या टिकटॉक विरोधकांनी सरळ टिकटॉक अँपलाच रिपोर्ट करायला सुरुवात केली.
ह्या व्यतिरिक्त टिकटॉकला रिपोर्ट करण्याची आणखी दोन कारणं आहेत. ती कोणती ते पाहुयात :
कारण १ :
टिकटॉक स्टार अमिद फैजल सिद्दीकी याने एक टिकटॉक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये त्याने स्त्रियांवर होणाऱ्या ऍसिड हल्ल्याचे समर्थन केले होते. त्यामुळे ह्या अँप मार्फत स्त्रियांवर होणाऱ्या ऍसिड हल्ल्याचा गौरव होतो अशी टीका करत टिकटॉकला बऱ्याच जणांनी रिपोर्ट केलं.
कारण २ :
टिकटॉक हे एक चायनीज अँप असून आधीच आपण चायनामुळे इतकं काही सहन करत असताना ह्या अनावश्यक चायनीज अँपला कशाला सपोर्ट करायचं म्हणून देखील बऱ्याच जणांनी टिकटॉकला रिपोर्ट केलं आहे.
ह्या सगळ्या महायुदधातून टिकटॉकची रेटिंग ४.५ वरून डायरेक्ट १.३ वर येऊन ठेपली आहे आणि ह्यामुळे टिकटॉकला मात्र मोठा फटका बसला आहे. परंतु मिमर्सचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला आहे आणि त्यांनी आपला आनंद आपल्या कला प्रविण्यातून दाखवला आहे. तर बघुयात मिमर्सनी हा आनंद व्यक्त करत काय काय मिम्स बनवले आहेत.
तर हा होता आजचा विषय 'एका आठवड्यात भारतीयांनी ४.५ वरून १.३ वर आणलेलं अँप'.
पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. ब्लॉग कसा वाटला ह्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. तसेच ब्लॉग ला follow करा जेणे करून प्रत्येक नवीन ब्लॉग आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला notification येईल. आणि हो ब्लॉग आवडल्यास शेअर करण्यास विसरू नका.