विद्यार्थ्यांचा गगनात मावेनासा आनंद क्षणार्धात झाला जमीनदोस्त :
८ मे २०२० रोजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ह्यांनी दिलेल्या वृत्तानुसार पदवीच्या (degree)च्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द करून आणि पदव्युत्तर (post graduation) स्तरावर फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील असा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय घेतल्यानंतर प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आणि अंतिम वर्षाच्या मुलांना मात्र मिम्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.
मात्र ३१ मे २०२० रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील रद्द करून सरासरी गुणांवरून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येईल असा निर्णय जाहीर केला. हा निर्णय घोषित केल्यानंतर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आनंदाची लाट उसळली. पण विद्यार्थ्यांचा हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कारण २ जून २०२० रोजी महाविद्यालयीन अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याविषयी राज्यातील विद्यापीठांच्या कु लगुरूंचे अनुकूल मत असूनही, ते विचारात न घेता राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे स्पष्ट झाले. आणि दि. ५ जून २०२० रोजी आपले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ह्यांनी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरच्या अंतिम परीक्षा १५ जुलै पासून सुरू करण्यात येतील असे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
परीक्षा आता कश्या घेणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे तसेच राज्यपालांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद सुद्धा सुरू आहे. पण काहीही असले तरी एकंदरीत विद्यार्थ्यांच्या मनाला मिळालेला तो क्षणिक आनंद मात्र एकदम होरपळून निघाला आहे. आता ह्या घटनेची मज्जा घेतल्याशिवाय मिमर्स थांबतील कसे. तर पाहुयात काय काय मिम्स बनवले आहेत आपल्या मिमर्स सेनेने.






No comments:
Post a Comment